अशी टिचकी मारल्यावर "गमभ" ची खिडकी उघडेल आणि शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करता येतील असे मला वाटले होते. पण संगणक म्हणजे गाडी चालवणे या प्रकारे मी चालवणारा असल्याने, हे किती सोपे/ कठिण आहे, ह्याची कल्पना नाही.

इतक्यात, मनोगतावर होणाऱ्या लेखनात असलेल्या (किमान) टंकलेखनाच्या चुका कमी झाल्या, तर वाचण्याचा आणि लिखाणाचाही आनंद वाढेल यात शंकाच नाही.

"सर्वांनी गमभची सुविधा वापरावी, अशी अपेक्षा आहे, पण ह्या सुधारणा केल्याशिवाय लेखन सुपूर्तच करता येणार नाही, अशी सोय करता आली तर ..." अशी माझी इच्छा होती. असो.

मनोगतावर लिहून माझे मराठी टंकलेखन चांगलेच सुधारले, ह्याबद्दल मनोगताचा मी ऋणी आहेच.