मनोगत टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करत नाही, तो फक्त टंकलेखित केलेले शब्द आपल्या शब्दसंग्रहाशी ताडून पाहतो आणि ते लिखाण ठरलेल्या संकेतांप्रमाणे आपोआप बदलतो.  एखादा शब्द संग्रहात सापडला नाही तर, शुद्धिचिकित्सक तो बहुधा तसाच ठेवतो, किंवा नियमानुसार त्यात बदल करतो. हा बदल चुकीचा असू शकतो. मनोगतावरून शुद्धलेखन सुधारायचे असेल तर(१)मनोगतावरचा शुद्ध शब्द संग्रह डोळ्याखालून घाला. (२) शब्द लिहिताना ऱ्हस्वदीर्घाची चूक करून पहा, शुद्धिचिकित्सकाने दुरुस्त केल्यावर शब्द बहुधा शुद्ध असेल, ते लिखाण  लक्षात ठेवा आणि योग्यवेळी वापरा. (३)
ध्‍द लिहायचा प्रयत्‍न करा द्ध उमटेल. 'आणी‌' लिहा, 'आणि' उमटेल.  'बालोद्‍यान' लिहा, 'बालोद्यान' उठेल. श‍ृ  लिहा शृ येईल, वगैरे.