बेशिस्त नागरीक म्हणावे का मुजोर गुंड म्हणावे तेच कळत नाहीये. वाहतुक पोलिसांनाच मारहाण करून लोक पळून जातायेत तर ते सामान्य नागरीकांना काय जुमानतील. माझ्या वडिलांच्या अंगावर ते रस्त्याच्या कडेने चालत जात असताना एकाने दुचाकी चढवली. आणि वर तोच उर्मटपणे भांडायला लागला नंतर लोक जमतायेत असे वाटल्यावर पळून गेला. वडीलांच्या पायाला फ्रॅक्चर जाल्याने ते काहीही करू शकले नाहीत. मागच्याच वर्षी मी टिळक रोड ला बादशाही पाशी सिग्नलला थांबले होते. समोर वाहतुक पोलिस होता. लाल दिवा लागला होता. तरीही एका कारने मागून येउन धडक दिली. मी गाडीवरून उडून बाजुला पडले, नशिबाने काही लागले नाही.
सध्याची वाहतुकीची एकंदरीत परीस्थिती पाहता यात काही सुधारणा होणे तर दुरच पण दिवसेंदिवस ती आण्खीन खराबच होत जाईल असे मला वाटते.