यूहन्न्याला का बरे पाचारण करता?
१. खरे तर मुहम्मदालाच पाचारण करणार होतो, पण काय आहे ना, की आयत्या वेळी त्याचे शब्द न आठवल्याने नाइलाजास्तव 'प्लान बी' आचरणात आणावा लागला. होते असे कधीकधी.
२. यूहन्न्याला पाचारण करण्याकरिता आगाऊ लेखी परवानगी मागावी लागते, अन्यथा जाब - किंवा किमानपक्षी खुलासा - विचारला जाऊ शकतो, याची कल्पना नव्हती. किंवा विस्मरण झाले खरे. वयोमानपरत्वे स्मरणशक्ती कधीकधी नाही देत साथ, काय करावे! शिवाय अठरा वर्षे तुलनेने बऱ्यापैकी विचारस्वातंत्र्य असलेल्या देशात (ते रवींद्रनाथ म्हणून गेले नाहीत का काहीतरी, की 'हे पित्या, भारताला अशा स्वर्गात जागे कर' वगैरे वगैरे, काय बरे ते... अरे हो, 'चित्त जेथा भयशून्य, उच्च जेथा शिर', तसे काहीसे) घालवल्यावर, हे असेही काही करावे लागते हे नाही राहत लक्षात, हेही लक्षात घ्या की राव!
३. पण काय हो, यूहन्न्याला पाचारण केले तर माझे हिंदुत्व मोडून पडते का हो? नाही म्हणजे, तुमच्या हिंदुत्वाबद्दलच्या तुमच्या कल्पनेबद्दल मला कल्पना नाही, पण माझे हिंदुत्व इतके ठिसूळ आणि तकलादू आहे असे मला तरी वाटत नाही.
पुण्यात शिस्तीने वाहन चालवणारा/री एकही नागरिक नाही म्हणता?
पुण्यात कोणी ठरवून जरी शिस्तीने वाहन चालवायचे म्हटले, तरी ते शक्य होईल की नाही याबद्दल मी तरी साशंक आहे. या की एकदा, आणि बघा की स्वतःच अनुभव घेऊन...
अवघड आहे.
मग एवढा वेळ चर्चेत एवढे सगळे शंख करून राहिले, ते कशाबद्दल असे वाटले तुम्हाला?