वा वा . खूप सुंदर ! संपुर्ण लेखमाला आवडली .
"शकुनी काय किंवा लादेन काय, एकाच मातीची लेकरे आहेत " ............. हा हा हा ... काय मस्त समानता शोधून काढली आहे !!
>>ब्रह्मविद्येच्या (अध्यात्माच्या) दोन इयत्ता आहेत, एक निर्गुण-निराकार आणि
दुसरी सगुण-साकार. केवळ निराकार मानायचे तर अपूर्णता येईल. निराकार-सगुण
असे ब्रह्म मानायचे तर निर्गुण-साकार ही संकल्पना उभी करावी लागेल किंवा या
दोन्हीतून फारतर जीवाचे स्वरूप मांडता येईल. हा प्रांत अर्थातच माझा
नव्हे.>>
निराकार-सगुण
असे ब्रह्म व निर्गुण-साकार ह्या दोन्ही संकल्पना बाउन्सर( डोक्यावरून ) गेल्या . असो
" सगुणाचेनी आधारे । निर्गुण पाविजे निर्धारे ।
सारासार विचारे । संतसंगे ॥ "
(बाकी महाभारतीय युद्धाबाबत / गीते बाबत भाष्य करावे इतका मी मोठा नाही , कृष्ण .. दहशतवाद .. अर्जुन .. गीता ..असला काही उल्लेख आला म्हणून
" न जानामि धर्मं न च मे अधर्मं , न जानामि नीतिः न च मे अनीती :
केनापि देवेन हृदिस्थितेन , यथा आज्ञापितोस्मी तथा करोमि !! " -- दुर्योधन ( थोडक्यात मला वाटतय तेच मी करणार .. तुमचा धर्म ,नीती अध्यात्म ,आत्मा, परमात्मा, प्रकृती गेल खड्ड्यात !! )
भगवद्गीतेतल्या अख्ख्या तत्त्वज्ञानाला (, कर्म अकर्म , नैष्कर्म्य , आत्मा , परमात्मा ...इ.इ.). हा एक श्लोक पुरून उरतो ( असे मला वाटते . ) )
!!तत्सतब्रह्मार्पणमस्तू !!