चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:


मागच्या आठवड्यात, चीनमधल्या शॅनडॉन्ग (Shandong) प्रांतामधे, एका स्थानिक शेतकर्‍याने, दोन तीन वर्षे वय असलेली पाच मुले व त्यांची शिक्षिका, यांच्यावर काहीही कारण नसताना चाकूने एकदम हल्ला चढवला. इतर दोन मुलांना त्याच्या हल्ल्यापासून कसेबसे वाचवता आले. यानंतर या शेतकर्‍याने स्वत:ला पेटवून घेतले व आत्महत्या केली. हा हल्ला या महिन्यातला या प्रकारचा चौथा हल्ला होता. याच्या थोडे दिवस आधी, जिआन्ग्सू (Jiangsu) प्रांतामधे, एका शिशूशाळेमधल्या मुलांच्यावर अशाच एका पिसाट माणसाने चाकूने हल्ला चढवला होता . या हल्ल्यात 28 मुले व 3 शिक्षिका जखमी ...
पुढे वाचा. : निष्पाप छोट्या मुलांच्या वरचे हल्ले