फक्त परप्रांतीय गुन्हेगारीला, विशेषतः वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार आहेत असे मला अजिबात वाटत नाही. पुण्या-मुंबईकडचे गुन्हे जरी एकवेळ बाजूला ठेवले तरी उरलेल्या महाराष्ट्रात काय सरसकट हे परप्रांतीय लोक गुन्हे करायला जातात काय? तेथील गुन्ह्यांमध्ये स्थानिकांचेच आधिक्य दिसते. 
सध्या शहरांमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीत भूखंड, जमीन, मालमत्ता इ. वरून बरेच गुन्हे घडताना दिसून येतात आणि त्यांत महाराष्ट्रातील नामवंत राजकारण्यांपासून ते गल्लीबोळातल्या दादापर्यंत मराठी माणसेच जास्त गुंतलेली दिसून येतात. हां, ते बिहाऱ्यांना किंवा परप्रांतियांना हाताशी धरत असतील. पण मोठमोठ्या गुन्ह्यांच्या मागे जाऊन पाहिलेत तर महाराष्ट्रातीलच चेहरे दिसतील. किमानपक्षी वर्तमानपत्रांत अटक, फरार, संशयित असलेल्या लोकांची नामबिरुदावली तरी तसेच दर्शविते. बिहाऱ्यांनी गुन्हेगारी फक्त व्यापक केली फार तर, तिला जास्त सोपे केले.... पण मूळ बिळात दबा धरून बसलेल्यांचे काय?