>>वाढीव वाहनसंख्येला आणि एकंदरीतच वाहतुकीला आवश्यक अशी मूलभूत सुविधासंरचना

हा योग्य मुद्दा आहे. पुणेकर मंडळी चळवळी म्हणून प्रसिद्ध आहेत. संरचना नीट करून द्यावी म्हणून कोणी कसली आंदोलने करताना कसे दिसत नाही?
दुसरे म्हणजे, वाढीव वाहने येण्यापूर्वी वाहतुकीला शिस्त होती का?

माझा साताऱ्यातला अनुभव तरी असा की जागा मिळेल तिथे वाहनचालक गाडी चालवतात. त्यात नियम वगैरे असतात हे कुणाच्याही गावी नसते. पुण्याची चाळीसेक वर्षांपूर्वीची अवस्था सध्याच्या साताऱ्यासारखी असावी असा माझा कयास आहे. (धोतरात घुसलेल्या सायकलस्वारांचे किस्से वाचून असे मत झाले आहे. :-))

मुळात वाहनचालनाचा परवाना मिळताना शिस्तबद्धता नीट तपासून घेतली नसल्याने हा घोळ होतो आहे असे मला वाटते. यावर उपाय म्हणजे सगळ्या वाहनचालकांना त्यांचे परवाने दर पाच वर्षांनी वगैरे नवीकरण करून घ्यायला लावणे व दरवेळी कसून परीक्षा घेणे.