उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:
अण्णाआजोबांची कित्येक सुभाषितं त्यांच्या अतिरेकामुळे मला तोंडपाठ झाली, पण कुसुमअज्जीचं एकच वाक्य मला आयुष्यभरासाठी पुरेल.
ती नेहमी म्हणायची, "सई, जगात असं काही नाही ज्याच्यामुळे आपल्याला मन:स्ताप किंवा पश्चा:ताप व्हावा." गंमत म्हणजे हे वाक्य तिला माझ्या बालचिंतांसाठी वापरावं लागत असे.
पण तिचं शांत, कुठल्याशा अदृश्य देवाशी एकरूप झालेलं रूप पाहिलं की खरंच वाटायचं, "कसली चिंता? अशी अज्जी आहे आपल्याला मग देव आपल्याबरोबरच असणार."
अज्जी मात्र मन:स्ताप होऊ नये म्हणून खूप विनोदी प्रकार करायची. ती म.ल.ग. हायस्कूलची मुख्याध्यापिका होती. ...
पुढे वाचा. : मन: स्ताप टाळण्याचे सोप्पे उपाय