प्रथम मी आपला , प्रसाद गोडबोले व मराठीप्रेमी यांचा प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपण म्हणता ते
खरे आहे. ही कथा मागील कथांसारखी नाही. ही कथा , कदाचित भयकथा या प्रकारात मोडू शकेल. यात फक्त माणसाच्या मनात असलेली भीती
शब्दरुपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तसा तिला उद्देश नाही किंवा तात्पर्यही काढता येणार नाही. मुळातच मृतदेहाबद्दल सर्वसाधारण
माणसाच्या मनात भीती असते (असं माझं मत आहे. ) आणि कथेतल्यासारखा विचित्र प्रकार जर घडला तर ती असं स्वरूप धारण करू शकेल.
तरीही रत्नाबाई ह्या उच्च शिक्षित आहेत. त्यांच वाचनही सर्वांगिण असणारच. म्हणून तर त्यांनी अशा विचित्र प्रसंगाचा वेगळा (अंधश्रद्ध ? ) अर्थ
लावला नाही. माझ्या मनात अशा भीतीचा अविष्कार करण्याचं होतं. तो सफल झाला किंवा नाही हे फक्त वाचकच ठरवू शकतात. त्यामुळे रत्नाबाई
आणि डॉक्टर यांचं नवपर्व सुरू झाल्याचं सूचित करणं व त्या अंगाने कथा फुलवणं मला योग्य वाटत नाही(आपण हा दृष्टिकोन लिहिल्यावरच मी
असे लिहीत आहे). किंबहुना मी त्या हेतूने ही कथा मी लिहिलीच नाही. उद्देश फक्त भयकथा लिहिण्याचा होता. संजय यांनी लिहिल्याप्रमाणे राग
येण्याचा प्रश्नच येत नाही. वेगवेगळ्या प्रतिसादांनी लिहिणाऱ्यालाही कथेचं वेगळं अंग दिसू शकतं. उत्तरात काही चूक झाली असल्यास कृपया
गैरसमज करून घेऊ नये.
आपल्या वेगळ्या प्रकारच्या प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा सर्वांचेच आभार.