अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

1977 -78 या वर्षांमधे माझ्या कारखान्याचे काम बर्‍याच सुरळितपणे चालू झाले होते. काही नवीन उत्पादने विकसित केली होती व त्यांच्यासाठी थोड्याफार ऑर्डर्स मिळत होत्या. स्वत:चे असे भांडवल नसल्यामुळे भांडवलाची चणचण आम्हाला नेहमीच भासत असे. युनायटेड वेस्टर्न बॅन्केने आम्हाला 5000 रुपयाचा ओव्हरड्राफ्ट दिला होता परंतु तो फारच अपुरा वाटत होता. माझ्या वडिलांच्या कारखान्याला वित्तपुरवठा बॅन्क ऑफ महाराष्ट्र कडून होत असे. माझी आई या बॅन्केचे व्यवहार पहिल्यापासून बघत असल्याने, एका भेटीत तिने बॅन्केच्या अधिकार्‍यांजवळ माझ्या धंद्याचा विषय काढला. ...
पुढे वाचा. : आव्हान-