कैफी आझमीने लिहिलेल्या आणि रफीने गायलेल्या गाण्यांचा परिचय छानच करून दिला आहे. एका बाबतीत कैफी दुर्दैवी म्हणावा लागेल की मदन मोहन आणि काही प्रमाणात हेमंतकुमार वगळता इतर मोठ्या संगीतकारांनी एक - दोन चित्रपटांपलिकडे त्याला संधी दिली नाही. खास करून रोशनबरोबर कैफीचे मोजून एकच गाणे असावे (अगदी ते सर्वश्रेष्ठ म्हणावे या प्रतीचे असले तरीही) याबद्दल थोडेसे वाईट वाटते.

त्याबाबतीत मदनमोहनची निष्ठा वाखाणण्यासारखी आहे. नुसतेच कैफी आजमी नाही तर राजा मेहंदी अली खान या गीतकाराबद्दलची आणि तलत मेहमूद या गायकाबद्दलचीही. राजा मेहंदी अली खान यांनी १९४५ - १९६० मध्ये बऱ्याच संगीतकारांबरोबर (सचिनदेव बर्मन - दो भाई, गुलाम हैदर - शहीद, रोशन - चांदनी चौक आणि बराती,  एस. एन. त्रिपाठी - हातिमताई ही सहज आठवणारी नावे) काम केले असले तरी १९६० नंतर फक्त मदनमोहन. तलत मेहमूदचे दिवस १९६० मध्ये  संपत आले असले तरी मदनमोहनने अगदी १९६६ च्या जहांआरापर्यंत त्याच्याकडून गाणी गाऊन घेतली.

विनायक