या स्मरणाआडच्या कवींची मी तर सारखी वाट पाहात असते.
- धन्यवाद.
त्यांच्या कवीता वाचणे म्हणजे एक पर्वणी असते.
-अगदी. अगदी.
कुठून तुम्ही ही माहीती मिळवता असेही मनात येते.
- समजला तुमचा प्रश्र्न!
मुळात मला कवितांची खूपच आवड असल्याने नव्या-जुन्या कवींविषयीची माहिती आणि त्यांच्या कविता जमवायचा मला छंद नव्हे़; तर नादच आहे. माझ्याकडे जुन्या पुस्तकांचा भरपूर साठा आहे व वाचनाची आवड मला मोठ्या प्रमाणावर आहे. टिपणे काढायची सवय काही वर्षांपूर्वी होती. ती आता कमी झाली आहे.
अनेक जुन्या पुस्तकांमधून, काही नामवंत मंडळींच्या गप्पांमधून, लेखनामधून मला या कवींची नावे कळत गेली... आवड असली की आपले लक्ष साहजिकच त्या विषयाकडे अधिक जाते. कवी आणि कविता याबाबतीत माझेही तसेच आहे. एकदा नावाचा सुगावा लागला की मी माझ्या परीने, कुवतीनुसार त्या त्या कवीचा शोध घेत जातो... इथे मी देत असलेली माहिती अशी अनेकानेक जुन्या पुस्तकांमधील (एकच एक नव्हे; तर असंख्य) आहे. त्यातील तपशील घेऊन तो मी माझ्या शब्दांत इथे मांडतो.
मी हे जे सदर लिहीत आहे, ते या अमूल्य (अर्थात माझ्या दृष्टीने) माहितीचे संकलन व्हावे, म्हणून लिहीत आहे. एखाददुसरे वाक्य वगळता कोणतेही ठाम, ठाशीव भाष्य या सदरात तुम्हाला आढळणार नाही. कारण तसे भाष्य कऱण्याची माझी पात्रता नाही.गेल्या पिढीतील कवींविषयीची माहिती सध्याही कुठेतरी नोंदलेली असावी, हा माझा हेतू या लेखनामागे आहे.
ह्या कवींची नावे तरी कशी कळतात?.
-वरील प्रश्र्नाच्या उत्तरात या प्रश्र्नाचे उत्तर मिळेल, असे वाटते.
पण कवीता मात्र निराळाच आनंद देउन जातात
-होय. तोच मीही घेतो आणि तुम्हीही घेत जा. :)
उत्सुक
-उत्सुकता शमली का?
- प्रदीप कुलकर्णी