लेख आवडला. कॅसेटी भरून घेणं मी पण केलं आहे. त्यातही एकात  अनारकली आणि मुगले आजम व दुसऱ्यात पाकीजा आणि उमरावजान ह्या भरून घेताना आणि नंतर सलगपणे ऐकताना झालेल्या/ होणाऱ्या आनंदाचे स्मरण झालं.

देखी जमानेकी यारी  बद्दल काय बोलायचं! बिछडे सभी बारी बारी ह्यातील बारी बारी रफीनं असं काही म्हटलंय की ते काळजालाच भिडतं. एकदम सगळे निघून गेल्यानंतर येणारं एककीपण वेगळं आणि एक एक गेल्यानंतर जाणवणारा एकटेपणा वेगळा! तो रफीच्या त्या ’बारी बारी’तून व्यक्त होतो. (जाता जाता ’मेरा सुंदर सपना बीऽऽत गया’ ('टूट गया' नाही) हे ऐकताना कसं स्वप्नभंग वेगळा आणि स्वप्नाची समाप्ती वेगळी हे कळतं,  थोडफार तसंच. ) 

'दो दिल’ मधलं हेमंतकुमार यांनी संगीतबद्ध केलेलं  ’तेरा हुस्न रहे मेरा इष्क रहे.. ’ त्यातल्या रफीसाहेबांच्या नशील्या आवाजाला कसं विसरता येईल?

फार फार गोड गाणं! विस्मरणात गेलं होतं. आठवण करून दिल्याबद्दल आभार.

ये दुनिया ये महफिल हे तर साक्षात दळण.