प्रतिसादाबद्दल आभार.
पाळणा
सुतार उत्तमसा तुजसाठी मिळविला
पाळणा रंगीत बनविला
चहूं बाजूंनीं राघू मोर बसविले
पाळण्यांत बाळ निजविलें
नीज नीज बाळा झोके देते मी तुजला
खेळून बाळ बहू दमला
एका फार जुन्या पुस्तकात मी पुढील वर्णनाचे एक चित्र पाहिल्याचे मला आठवते.
अंगडे-टोपडे घातलेले बाळ पाळण्यात झोपलेले आहे. बाळाने एक पाय वर उचलला असून, त्याचे दोन्ही हात फैलावलेले आहेत...आणि पाळण्यावर लटकणाऱया कापडी चिमणीकडे पाहून ते खुदकन हसत आहे...
या चित्रासोबत हीच कविता होती किंवा कसे, हे मात्र सांगता येणार नाही. कारण, आठ-दहा वर्षाच्या मला त्या वेळी कविता कशाला म्हणतात, हे ठाऊक नव्हते. :) मात्र, वर वर्णन केलेले चित्र अगदी लख्ख आठवते...
ते पुस्तक मिळणे आता अशक्य आहे... कारण, मी शोधले असता मला जुन्या पुस्तकांत आढळले नाही... पण काही हरकत नाही. या चार ओळीच्या आधारे ती पूर्ण कविता आपण शोधून काढू :)
उत्तराला उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.
प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
- प्रदीप कुलकर्णी