लेख खूपच छान. मला अजुनही कॅसेट वरच गाणी ऐकायला जास्त आवडतात. पहिला टेप रेकॉर्डर घेतला तेव्हा त्यावर एक कॅसेट फ्री मिळाली होती ती आम्ही "आँधी मौसम" ची घेतली होती आणि नवीन जागेत बरेच वेळा ऐकली होती त्याची आठवण झाली. त्यात आँधी मधले "तुम आ गये हो नूर आ गया है... याचे तर मी पारायण केले होते. पूर्वी रेडिओ कम टेप रेकॉर्डर वरून  बरीच आवडीची गाणी परस्पर मोकळ्या कॅसेट मध्ये जमा केलेली आठवली. काही वेळेला एखादे गाणे कॅसेटमधले पसंत नसेल तर त्यावर दुसरे गाणे रेकॉर्ड केल्याचेही आठवले. ज्या गाण्यावर दुसरे गाणे रेकॉर्ड करायचे असेल त्या दोन्ही गाण्याची मिनिटे मात्र तंतोतंत जुळायला हवीत नाहीतर पुढील गाण्याचा काही भाग पुसला जाऊ शकतो. कॅसेटमध्ये कोणकोणती गाणी आहेत याची अनुक्रमणिका सुवाच्य अक्षरात लिहून काढणे आणि ती कॅसेट मध्ये खोचून ठेवणे याचीही आठवण झाली. एका गाण्याकरता बाकीचा कचरा विकत घेण्यापेक्षा कॅसेटच्या दोन्ही बाजूने सर्व गाणी चांगली म्हणजे २ चित्रपटांची  सर्व गाणी  एका बाजूला एक चित्रपट दुसऱ्या बाजूला दुसरा अशा काही कॅसेट आम्ही विकत घेतल्या होत्या.