कॅसेटी भरुन घेण्याचे काम पौगंडावस्थेत मीही केले आहे. फिल्मी गजला, कभी कभी, सिलसिला आणि ऋषीकपूर-शाहरुखखानचा दिवाना वगैरे रोम्यांटिक सिनेमांच्या गाण्यांपासून हिम्मतवाला, तोहफा वगैरे चित्रपटांसकट त्याच क्यासेटीमध्ये जागा शिल्लक आहे म्हणून जवा नवीन पोपट हा' वगैरे काहीही ऐकायच्या दिवसात एका गाण्याला ३ रुपये या दराने क्यासेटी भरून घेतल्या होत्या. ;) त्यावेळी तुम्ही वर लिहिलेली ब्लॅक ऍंड व्हाईट गाणी डाऊनमार्केट वाटायची. अशा भरुन आणलेल्या क्यासेटींनी दोन मोठी खोकी अजून धूळ खात पडून आहेत. आता ती गाणी ऐकावीशीही वाटत नाहीत. (म्हणजे आवड प्रगल्भ झाली म्हणायची ;) ). पण तसेही यूट्यूबच्या जमान्यात सीड्याही आऊटडेटेड झाल्यात तिथे क्यासेटींचे काय?