सांगत्ये ऐका... येथे हे वाचायला मिळाले:
मी एक अत्यंत खमकी बाई आहे. सहसा धीर (धूर नव्हे) सोडत नाही. आमचे बाबा नेहेमी आमच्याविषयी 'मुली खंबीर आहेत' असे म्हणतात (आणि आई आम्हाला 'पाषाणहृदयी' म्हणते). पण तरी काही घटना, प्रसंग, कोणाची नुसती आठवण, फोनवर ऐकलेला आवाज ह्या गोष्टी अशा असतात की कितीही दात-ओठ खाल्ले तरी डोळे जुमानत म्हणून नाहीत. माझा एक मित्र नेहेमी म्हणायचा Everybody has a weak moment. असे अशक्त क्षण अनेक येतात आयुष्यात. कधी तेव्हढ्या पुरतं वाईट वाटणं असतं तर काही प्रसंग काही म्हणता पाठ सोडत नाहीत. कित्येकदा विस्मयात पडावं असं आपण वागतो. आपल्या स्वत:च्याच व्यक्तिमत्वाविषयी, ...