माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर! येथे हे वाचायला मिळाले:

नुकतेच पारपत्र(पासपोर्ट) काढण्यासाठी पुणे पारपत्र कार्यालयात जाण्याचा योग आला. माझ्या अनेक मित्रांचे पासपोर्ट आता (न वापरताच) संपत आले असले तरी माझ्याकडे अजून पासपोर्ट नाही ही गोष्ट मला दिवसेंदिवस सलत होती, त्यामुळे पासपोर्ट काढायचा निर्णय झाला. हे एक सरकारी कार्यालय, त्यातच पारपत्र काढणे हे एक खूप किचकट काम अशी माहिती अनेकांकडून मिळाल्यामुळे तिथे जाताना मनात थोडीशी धाकधूकच होती, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. ९ वाजता तिथे पोचलेला मी १२:३० वाजता पारपत्राची पावती घेऊन बाहेर पडलोही, अर्थात याचे श्रेय तिथल्या चांगल्या ...
पुढे वाचा. : पुणे पारपत्र कार्यालयातला सुखद अनुभव!