तुमची उत्सुकता शमली की नाही?
ती शमावी, म्हणून एवढे सविस्तर उत्तर दिले.
नव्याने ओळख झालेल्यांना आणि परिचितांनाही मी अशाच पद्धतीने उत्तरे लिहितो. खास करून ई-मेलमधून अथवा 'व्यक्तिगत निरोप'मधून. एकेक मुद्दा घेऊन लिहिणे मला सोईचे जाते. या पद्धतीमुळे कुठलीही संदिग्धता राहत नाही. बाकी अशी उत्तरे लिहिण्यामागे अन्य उद्देश कुठलाच नाही. [ (हां, एक मात्र आहे की, प्रश्नपत्रिका सोडवितानाची विद्यार्थिदशाही परत एकदा अनुभवता येते!!! :) ]
अशी उत्तरे लिहिण्याच्या माझ्या या पद्धतीकडे दुर्लक्ष करावे आणि तुमच्या प्रत्येक मुद्द्याचे उत्तर मिळाले की नाही, एवढीच खातरजमा करून घ्यावी. :)
पुन्हा एकदा धन्यवाद.