अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या शुक्रवारी, एका छोट्याच्या दुसर्या वाढदिवसाच्या पार्टीचे मला निमंत्रण आले होते. ही पार्टी होती पुण्याच्या औंध भागातल्या एका रेस्टॉरंटमधे. मी या ठिकाणी पूर्वी कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे तिथे गेल्यावर, तिथले एकूण वातावरण, झगमगाट व लोकांची गर्दी पाहून मला थोडेफार आश्चर्यच वाटले. आपण नक्की पुण्यातच आहोत का? अशी शंकाही क्षणभर मनाला चाटून गेली. हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या एका पोहण्याच्या तलावासदृष्य दिसणार्या एका तळ्याच्या आजूबाजूने टेबले लावलेली होती. तिथे ही पार्टी होती. एकूण ते रेस्टॉरंट बड्या लोकांसाठीच होते हे उघड दिसत ...
पुढे वाचा. : माझे पुणे, तुमचे पुणे!