वाः राव! आठवणींचं मोहोळ उठवलंत तुम्ही! एक कंकर काय फेकलात आणि मधुघटातून मधाची धार की हो लागली!   'बिछडे सब बारी बारी' तर ग्रेटच पण इतरही बरीच आठवतात.... 'जला दो इसे फूंक डालो यह दुनिया, मेरे सामनेसे हटा लो यह दुनिया' मधला उद्वेग, संताप आणि हताशा; 'चाहूंगा मैं तुझे साँज सवेरे--आवाज़ मैं न दूंगा' मधली आर्तता, 'सर जो तेरा चकराये.... काहे घबराये'मधला जॉनी वॉकरलाच शोभेसा विदूषकीपणा, 'दीवाना हुआ बादल' मधल्या प्रत्येक अक्षरातून ओसंडणारा आनंद आणि अल्लडपणा,'तेरी प्यारी प्यारी सूरतको--चश्मे बद् दूर' मधलं प्रेमातलं पागलपण, 'तारीफ करूं क्या उसकी"मधला उल्लूपणा सगळं सगळं स्वरांतून अगदी थेट व्यक्त होतं.

रफी साहिबांचे काही उच्चार तर खासच. 'तू गंगा की मौज' मधला 'ज' चा उच्चार, 'तुझे मैं चाँद समझूंगा' मधल्या 'तुझे'तल्या 'झ' चा उच्चार, 'नैन लड गई हो' मध्ये 'ल ' आणि 'ड' चे कोमल उच्चार,'यह लखनऊ की सर् ज़मीं,'मधला 'ल' चा खणखणीत उच्चार, गरीब, गलत या शब्दांतले 'ग' चे उच्चार... काय काय म्हणून लिहायचं? हिंदीतले अनुस्वारयुक्त शब्द तर त्यांच्याइतके सुस्पष्ट आतापर्यंत कुठल्याच गायक/गायिकेने उच्चारलेले नाहीत, अगदी लताताईंनी सुद्धा. जिन्हें नाज़ है हिंदपर वह कहाँ हैं, ये आँखें ऊफ यूं मां, 'मैंने जीना सीख लिया', 'यूं तो हमने लाख हसीन देखे हैं,''लाखों हैं निगाह में जिंदगी की राहमें' हे सर्व आठवून पहा.

 आणि 'कारवाँ गुज़र गया ' कसं विसरणार?    

स्मरणरंजन (नॉस्टाल्जिया) जागवल्याबद्दल धन्यवाद!

ता. क.  साहिर-रफी हे सुद्धा एक जालिम रसायन आहे....