व्हायोलीन हे जरासं हृदयविकाराला आमंत्रण देणारंच वाद्य.

आवडलें.

'ऑल इंडिया रेडिओ की उर्दू सर्व्हिस' चे ७०-८० दशकातले दिवसही आठवले. इथें गायक संगीतकाराबरोबरच शायरचेंहि नांव और लब्ज हैं अमुक अमुक साहबके म्हणून न चुकतां सांगत असत. रेडिओलहरींची कंपनसंख्या सांगतांना दशांश चिन्हाला उर्दूमध्यें अशार्य अशा कांहींशा उच्चाराचा प्रतिशब्द निवेदक वापरीत तें आठवलें. गाण्यांचा क्रम कसा असावा, कार्यक्रम एकसुरी न होतां विविधता कशी येईल याचा वस्तुपाठच इथें मिळें. मग कॅसेटमध्यें गाणीं कोणत्या क्रमानें भरावीत तें ठरवायला मदत होई. आतां जसा कॅसेट प्लेअर कालबाह्य झाला तसा मध्यम लहरी - मीडिअम वेव्ह रेडिओ देखील कालबाह्य झाला आहे.

असो. फारच सुरेख लेख.

सुधीर कांदळकर