अर्थ - अनर्थ येथे हे वाचायला मिळाले:
सध्या मला पापड खाण्याचा नाद लागला आहे. उडदाचे दोन पापड मायक्रोवेव्हमध्ये दीड मिनिट भाजायचे आणि हाणायचे - छान वाटतं. माझ्या आजीला या पापड-सत्राची गंमत वाटते. [मी पहिल्यापासून एककल्ली आहे असा तिचा समज आहे (ते विशेष खोटं आहे असं नाही...)]
मला ती बोलता बोलता म्हणाली, "हल्ली काय, तयार पापड विकत आणायचे आणि खायचे. आमच्यावेळी..." यापुढे गाडी वाळवणं, शेजारणी, कावळे, सबनिसांचा अंतू (जो पहाता पहाता वाळवणं फस्त करायचा) वगैरे स्टेशनं घेत जाणार हे उघड होतं. हल्लीच्या ‘रेडीमेड’ संस्कृतीबद्दलचा तिचा विषाद जाणवून गेला.
काळ बदलला, संस्कृती ...
पुढे वाचा. : तयार पापडांचे अर्थकारण