परंतु तितकाच कठीणही. कारण अशा विषयावरील लेखन कितीही संयमित करायचे म्हटले तरी ते शब्दबंबाळ होऊ शकते. इथे तसे झालेले नाही. तरी काहीतरी सुंदर उजाळा मिळतो आहे, इतक्यातच सर्व संपून टाकले गेले असे मला वाटत राहिले. 'देखी जमाने की यारी' सारख्या गाण्यात रफीसाहेबांनी जी कमाल केली आहे, ती शब्दात कशी व्यक्त करायची, हा खरेच कठीण प्रश्न आहे.

'तेरा हुस्न रहे' मी का कोण जाणे रविचे समजत होतो आणि इथे काहीतरी 'भयंकर' चुकते आहे असे मला सारखे वाटत होते. आता ते हेमंतकुमारचे आहे हे कळल्यावर 'बरे' वाटले! लेख रफी आणि कैफी आजमी ह्यांच्यावर आहे तरी कैफींच्या एकदोन गाण्यांचे उल्लेख केल्याशिवाय पुढे जाववत नाही. एक 'कुछ दिल ने कहा' हे अप्रतिम व्हिस्पर गीत, आणि दुसरे 'ऐ बेकरार दिल, हो चुका है मुझको आंसूओं से प्यार' हे !! अजून एक-- सत्यकाम मधील 'दो दिन की जिंदगी' इतके अप्रतिम लिहीले गेले आहे की आनंद बक्षीला हे कसे बरे सुचले असे कोडे मला पडले होते, ते अचानक एकदा अलिकडे त्याच्या माझ्याकडील कॅसेटवर क्रेडिटस वाचतांना सुटले.