मार्गिका हा शब्द सोपा आणि बरोबर पण वाटतोय. छत्रमार्ग वापरायला जड वाटेल कदाचित. अर्थात लेनसाठी चपलख शब्द कोणता ते तज्ञ सांगतीलच. पण हा शब्द वाचून आणखी एक प्रश्न पडला, छत्र म्हणजे वाहन का? मला असे विचारायचे आहे की या शब्दाचा विग्रह छत्र + मार्ग असावा असे वाटत आहे, जर तो तसाच असेल तर त्या 'छत्र'चा अर्थ काय?