शेखर जी, फारच संकुचित विचार आहेत बुवा तुमचे. त्यापायीच इतके प्रश्न, इतका गोंधळ आणि मग वैफल्य आणि आशावाद असा सगळा फापटपसारा वाढतो आहे. आता असे बघा, की तुम्ही भारतीय वगैरे काही नाही. तुमचा जन्म म्हणजे एकसंध अस्तित्वात एक जीव जन्माला आला असे म्हणू आपण फार तर. तो ही खरेच आला, की पाण्यात उगाचच एक बुडबुडा पैदा झाला आणि पाण्यातच विरून जाईल याचा खरे तर शोध घ्यायला हवा. जमल्यास अवश्य घ्या. आता या जीवाने बाकी नसते उपद्व्याप सोडून स्वाभाविक प्रेरणेनुसार फक्त अधिक आनंदमयी अवस्थेचा शोध घेत निवान्त होणे हाच सन्मार्ग. तुम्ही वाममार्गाला लागलात ही तुमचीच जबाबदारी नाही का? तुम्हाला कितपत समज आहे याचे मूल्यमापनही एकदा (एकमेव) अधिकारी व्यक्तीकडून अवश्य करून घ्या.

हे लोकलमधले स्फोट, काश्मिर वगैरे व्यर्थ, अमंगळ  विचार सोडून द्या. वाचा - 'पूर्णमदः पूर्णमिदम' वगैरे. बघा कसा दिलासा मिळतो ते. काश्मिर पूर्णातच राहील. लोकलमध्ये फुटलेले बुडबुडे तरी कुठे जातील? पाण्यातच विरतील ना?  एकंदर संकटाना सामोरे जाण्याच्या ज्या वृत्ती बद्दल तुम्हाला आक्षेप आहे, तीच बरोबर आहे. उगाच सैरभैर होऊन चिथावणीखोर लेख लिहीण्यात उर्जा वाया घालवू नका. त्यापेक्षा विधायक वृत्ती ठेवा. 'दहशतवाद्यानसाठी सुलभ अष्टावक्र सन्हिता', 'गावगुंडासाठी रमण गीता' असे काही लिहाल तर मोलाचे ठरेल. ते अवघड वाटत असेल, तर 'वेदव्यासांचा खोटारडेपणा', 'कर्णाच्या जन्माचे जैवशास्त्रिय रहस्य, सूर्याच्या डी एन ए चाचणीचा अहवाल' असा एखादा प्रबंध लिहा. ज्ञानीजनांचा सहर्ष पाठिम्बा मिळेल. वाचकाना निर्भेळ सात्त्विक आनंद मिळेल. तुम्ही पण एकदम तणावमुक्त होऊन जाल. आहे की नाही सगळे सोप्पे? धन्यवाद.