थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:
आपल्याकडे पूर्वी सहा ऋतू असायचे (कोणते बरं...?!) हल्ली तीन असतात (हे कोणते ते सांगायची गरज नाही!). तसं इथे फ्रांसमध्ये चार ऋतू असतात. (आंतरराष्ट्रीय फॅशनवर नजर ठेऊन असलेल्यांना माहिती असेलच.. Spring/Summer.. Fall/Winter वै). तरी यांची फ्रेंच नावं अशी, printemps (म्हणजे spring, एप्रिल ते जुन), été (म्हणजे summer, जुलै ते सप्टेंबर), automne (म्हणजे fall, ऑक्टोबर ते डिसेंबर), hiver (म्हणजे winter, जानेवारी ते मार्च). म्हणजे मराठीत सांगायचं तर वसंत, उन्हाळा, पानगळ आणि हिवाळा. याचा अर्थ फक्त हिवाळ्याचे तीन महिनेच थंडी असते असे अजिबात नाही... उलट ...