'उमलत्या कळ्या' या शीर्षकातून तरुण मुली सूचित होऊ शकतात हे गृहीतक मान्य झाले हे बरे झाले. तरुण मुली या समस्याग्रस्त असावयाच्याच हे विधान जरी शंभर टक्के सत्य नसले तरी आणि तरुण मुली या भावमधुर, भावविभोर, रम्या, मुग्धावस्थेत असतात व त्यांच्या बाबतीत अथवा त्यांच्याकडून सकारात्मक क्रिया घडतात हे विधान लोकप्रिय, बहुमान्य होण्याजोगे असले तरी, दोनही बाजू समान मानता; या दोन्ही अवस्थांतली विकारविलसिते वाचण्यात, मनोगतींना बहुधा रस असावा हे भाकित, रस असला पाहिजे ही अपेक्षा आणि असलाच पाहिजे हा आग्रह अनाठायी ठरावा. 'द केस् अव्ह् अ मिसिंग डॉटर्' आणि 'द केस अव्ह् अ ब्लूमिंग डॅम्सेल्' दोन्ही समसमान रटाळ असू शकतात. तरुण मुलींच्या कैफियतीमध्ये रस नसणे हे (निदान काहीजणांच्या बाबतीत तरी) स्वाभाविक आहे आणि ह्या कैफियती वाचाव्या न लागल्यामुळे हुश्श वाटणे ही स्वाभविक आहे.
अर्थात, ज्याची त्याची आवड, ज्याचा त्याचा रस, हे खरेच.