नेहमीप्रमाणेच अनुभवसमृद्ध लेखन.

अर्थात याचा अर्थ मराठी लोक जिथे जातात तिथे इतर भाषा अवगत करून त्यांचे गाडे चालते असा होतो किंवा इंग्रजी येत नसले तरी हिंदीत काम चल जाता है!

हिंदीत काम चल जाता है ... ह्या वृत्तीमुळेच मराठीचा सर्वात जास्त तोटा होत असावा असे मला वाटते.

तरीही काही शब्द मला भाषांतरित करता येतात पण समजावता नाही येत. असेही असावे की जेव्हा आपण आपली प्राथमिक भाषा शिकतो तेव्हा शब्दांचे स्थान हे दुय्यम असते... आपला अनुभव हा प्राथमिक असतो आणि ते शब्द त्या अनुभवाला व्यक्त करण्याचे साधन असतात. त्यामुळे प्रत्येक शब्दाला अनुभूतीची आणि त्यासोबतच्या भावभावनांची जोड असते. एक व्यक्ती म्हणून जगताना, वाढताना ती भाषा तुमच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग असते

अतिशय सुंदर सांगता.

पु. ले. शु.