'उमलत्या कळ्या' या शीर्षकातून तरुण मुली सूचित होऊ शकतात हे गृहीतक
मान्य झाले हे बरे झाले.
तसेही यात अमान्य होण्यासारखे काही असावे असे वाटले नाही. असो.
तरुण मुली या समस्याग्रस्त असावयाच्याच हे विधान जरी शंभर टक्के सत्य नसले
तरी आणि तरुण मुली या भावमधुर, भावविभोर, रम्या, मुग्धावस्थेत असतात व
त्यांच्या बाबतीत अथवा त्यांच्याकडून सकारात्मक क्रिया घडतात हे विधान
लोकप्रिय, बहुमान्य होण्याजोगे असले तरी, दोनही बाजू समान मानता; या दोन्ही
अवस्थांतली विकारविलसिते वाचण्यात, मनोगतींना बहुधा रस असावा हे भाकित, रस
असला पाहिजे ही अपेक्षा आणि असलाच पाहिजे हा आग्रह अनाठायी ठरावा.
असा कोणताही आग्रह अथवा अपेक्षा (कोठल्याच बाजूने) असल्याचे जाणवले नाही. मुदलातला आग्रह नसल्यामुळे तो अनाठायी ठरण्या-न-ठरण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
'द केस् अव्ह् अ मिसिंग डॉटर्' आणि 'द केस अव्ह् अ ब्लूमिंग डॅम्सेल्'
दोन्ही समसमान रटाळ असू शकतात.
अर्थात! याबद्दल दुमत नसावे. (अवांतर: 'ब्लूमिंग' डॅम्सेलवरचा श्लेष - अपेक्षित असल्यास - आवडला.)
तरुण मुलींच्या कैफियतीमध्ये रस नसणे हे (निदान काहीजणांच्या बाबतीत तरी)
स्वाभाविक आहे आणि ह्या कैफियती वाचाव्या न लागल्यामुळे हुश्श वाटणे ही
स्वाभविक आहे.
मुळात लेखाच्या शीर्षकातून अशा कोणत्याही कैफियती (कोणत्याही प्रकारच्या वा कोणत्याही बाजूने) सूचित होत नाहीत, अत एव त्या (मुळातच नसलेल्या वा नसण्यासारख्या) कैफियती वाचाव्या न लागल्यामुळे हुश्श वाटणे हे अनाठायी आहे, एवढाच मुद्दा आहे.
(हा मुद्दा पटवून देण्यासाठी देण्यासारखे चपखल समांतर उदाहरण या क्षणी आठवत नाही, परंतु तरीही एक क्षीण एक्सटेंपोरेनियस प्रयत्न करून पाहतो. तितकासा चांगला नसण्याची शक्यता आहे, परंतु तरीही जमल्यास गोड मानून घ्यावा.
'गीतारहस्य' या शीर्षकावरून 'आता गीता नावाच्या मुलीच्या गरमागरम प्रकरणांचे तपशील वाचावे लागतात की काय' अशा भावनेने पुस्तक उघडल्यानंतर, पुस्तकात तसे काही न सापडल्यास हुश्श वाटणे साहजिक आहे. किंवा 'गीतासार' या शीर्षकावरून 'आणखी एक साराच्या पाककृतींचे पुस्तक - या वेळी गीता नावाच्या बाईने लिहिलेले' अशी भावना होणे आणि पुस्तक वाचल्यानंतर झालेल्या सुखद अपेक्षाभंगाने हायसे वाटणे हेही एक वेळ क्षम्य आहे. परंतु याच 'गीतासार' या शीर्षकावरून 'गीता नावाच्या मुलीच्या अतिसाराच्या विकाराच्या तपशिलांचे यथोचित आणि रसभरित वर्णन करणाऱ्या वैद्यकीय पुस्तका'च्या अपेक्षेचा भंग झाला म्हणून कोणी जल्लोष करणे हे समजण्यासारखे नाही. मग बाजारात अतिसारावरच्या - किंवा अतिसारक - अतिशयोक्त पुस्तकांचा अतिरेक झाला असला, तरीही.)
अर्थात, ज्याची त्याची आवड, ज्याचा त्याचा रस, हे खरेच.
आभारी आहे.