कळीचा मुद्दा एव्हढाच आहे की 'उमलत्या कळ्या' या शीर्षकामुळे शीर्षकांकित लेखामध्ये तरुणींविषयी('विषय' शब्दावर कोणताही श्लेष अपेक्षित नाही. ) मजकूर असेल अशी अपेक्षा निर्माण होते ('असे सूचित होते' हे अधिक योग्य ठरेल का?) आणि तसा तो नसल्याने हायसे अथवा हुश्श वाटते.

शंका: तरुणीविषयी (माझ्याही मनात येथे विषय नाही) मजकूर नसल्याने हुश्श का वाटावे हे कळले नाही. तरुणीं(बद्दलच्या मजकुरा)विषयी आसक्ती नसणे हे एक वेळ समजण्यासारखे आहे, पण त्यामुळे हुश्श वाटण्याइतकीही अतिरेकी विरक्ती योग्य नव्हे, नाही काय?

'समस्या सूचित होत नाही' हे स्टेटमेंट् योग्य ठरावे.

हेच दाखवून द्यायचे होते. आभारी आहे.

'ब्लूमिन्ग् डॅम्सेल्' आवडली; {('ब्लूमिन्ग्  डॅम्सेल्' हा शब्दप्रयोग आवडला),(किंवा त्यातला श्लेष आवडला)},  आभार.

कसचे कसचे.

अवांतर: कंसात कंसाची (त्यातही महिरपी कंसाची) पद्धत आवडली. नवीन नाही, अगोदर पाहिलेली आहे, परंतु तरीही जाम आवडली. (यास 'अक्षयकंसमालिका' हे नामाभिधान कितपत उचित ठरावे, यावर विचार करीत आहे. म्हणजे न संपणाऱ्या कंसांची मालिका. कंसात कंसात कंस, नुसते वाढतच चाललेले कंस. कर्कग्रस्त झाल्यासारखे. असो. वाईट उपमा, चूभूद्याघ्या. त्यापेक्षा पोहे बरे.)