१४.१०.१९७५ ला माझा जन्म झाला.
म्हणून तारीख ती घेतलीय
अवांतर :- लेखनाचा प्रकार आणि त्यातला आनंद घेणे इतकाच मला कळते. उगाच ओढून ताणून शब्द आणण्यात मजा नसते. एक खेडूत "पुणेरी" भाषा बोलतो, हे वाचायला कसे वाटेल ? किंवा अकोटकडची भाषा वापरली तर त्यात हिंदीचा हेल येतो. मिर्झा बेग यांची वेगळीच बोली आहे, या सगळ्याच मराठीच्या वेगवेगळ्या बोली भाषा आहे. नको तिथं प्रमाणभाषेचा (म्हणजे पुणेरी नव्हे) आग्रह धरणं बरं नव्हे. ते त्या लेखनाला मारक ठरेल. छत्रपतींनंतर पेशव्यांऐवजी नागपुरच्या भोसल्यांचे महाराष्ट्रावर राज्य असते, तर वऱ्हाडी ही प्रमाणभाषा झाली असती, पण असे म्हणणे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर .... असे होईल. असो.
नको तिथे प्रमाणभाषेचा असा आग्रह धरणे म्हणजे एकसुरीपणा आणणे असं मला वाटते.
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.