ही सत्यकथा नाही, यापूर्वी सत्यघटनांवर आधारित कथेत मी तसा स्पष्ट उल्लेख केला आहे. वैज्ञानिक प्रगतीचा अंदाज कथेत व्यक्त केला गेला तर तो आक्षेपार्ह ठरत नाही. फार पूर्वी लिहिल्या गेलेल्या विज्ञानकाल्पनिकात त्यावेळी शक्य नसलेल्या वैज्ञानिक कल्पनांचा आधार घेतला गेला आहे . आणि आजही आयझॅक असिमोव्ह वगैरेंनी लिहिलेल्या वि. का.मधील सर्व गोष्टी प्रत्यक्षात उतरलेल्या आहेत असे नाही म्हणजे तसा अंदाज बांधणे अयोग्य आहे असे नव्हे. अर्थात ही पूर्ण अथाने वि. का आहे असे मला म्हणायचे नाही.अशा प्रकारची कथा वाचून त्यावर चर्चा होणे हे मात्र मला इष्टच वाटले .त्याबद्दल दोघांनाही धन्यवाद !