१:- कुठलाही विषय अति झाला की त्याचा तिटकारा येऊ शकतो. त्याला तरुणीही अपवाद नसाव्या. येथे 'अति होणे' हा पूर्वपक्ष (पक्षी: पूर्वरंग) मानल्यास विरक्ती हा उत्तरपक्ष असू शकतो. [बाकी, 'रंगी रंगले मन' अशी स्थिती सदैव असणे ही देखिल एक उच्च आद्ध्यात्मिक अवस्था मानू ये. (मुख्य कंस महिरपदार नसून सपाट आहे.)]
२:- तरुणींचा विषय महिरपी कंसांमुळे {येथे 'कं'चा 'के'होऊ नये याविषयी दक्षता बाळगली आहे; प्लीज् नोट्! }अधिक खुमासदार होऊ शकतो. अर्थात, ज्या. त्या. आ.; ज्या. त्या. रस!
३:- ही तर कंसग्रस्तता झाली.
४:- वाईट उपमा सकाळी सकाळी अधिकच वाईट. त्यापेक्षा पोहे बरे. शंभर टक्के सहमत.दुमत होण्याची शक्यताच नाही. अगदी दडपेही चालतात.
५:- तूर्तास अर्धविराम;
६:- एकंदर झकास. मजा आली. आभार.