कुठलाही विषय अति झाला की त्याचा तिटकारा येऊ शकतो. त्याला तरुणीही अपवाद नसाव्या.

थोडक्यात, 'अतिविषयात् अवज्ञा'सारखा काही प्रकार म्हणता येईल का?

(मी तरुणी नसल्यामुळे तरुणी यास अपवाद असाव्यात की नाही याबद्दल प्रथमहस्त माहिती देऊ शकत नाही. क्षमस्व.)

येथे 'कं'चा 'के'होऊ नये याविषयी दक्षता बाळगली आहे; प्लीज् नोट्!

एक कुतूहल. मनोगतावर कोठलेही व्यंजन हे आपोआप (स्वर जोडला नसता) हलन्त उमटत नाही. इतर मराठी संकेतस्थळांवर ते सहसा तसे उमटते (विशेषतः शब्दातील अंतिम व्यंजनाच्या बाबतीत), असे निरीक्षण आहे.

वरील अधोरेखितातील (तसेच आधीच्या प्रतिसादांतील ब्लूमिंग्, डॅम्सेल्, केस् वगैरेंमधील) अंतिम हलन्त हे विशेष कष्ट घेऊन टंकिले होते काय? (सहजच विचारले. एक कुतूहल म्हणून. विशेष काही नाही.)