आज खूप दिवसांनी मनोगताला भेट दिली आणि सन्जोप रावांचा हा लेख आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून मीदेखील स्मरणरंजनात हरवले.
तसा माझा आणि 'कॅसेटीं'चा संबंध फक्त शालेय वयापर्यंतच आला. (नंतर 'सीड्या' आणि आता तर युट्युब! युट्युबकरता तर गूगलचे शतशः आभार!!) मी बरीच लहान असताना नवीन टेप रेकॉर्डर-प्लेयर आणला होता. रोहिणी यांच्यासारखेच माझी आईसुद्धा दुपारी रेडिओवर आवडीचे गाणे लागले की ते एखाद्या नावडत्या गाण्याच्या जागी रेकॉर्ड करायची. त्या वयात मला तर आपला आवाज रेकॉर्ड होतो आणि नंतर आपल्याला ऐकायला मिळतो याचं अतिशय कौतुक होतं. मग आई कॅसेटमध्ये उरलेल्या जागेत माझी एखादी आवडती कविता माझ्याच आवाजात रेकॉर्ड करून देई.
आई तर अजूनही DVDs सोडून कॅसेट्स आणि रेडिओच (तेही आकाशवाणी किंवा विविध भारती. FM नाही) ऐकते.
रावसाहेबांनी तर अनेक सुंदर गाण्यांची आठवण करून दिलीच पण बाकी मनोगतींनीही त्यात भर घातली. सगळ्यांचे आभार!