मौन शब्दांचे सुरू आहे अघोरी!
त्यावरी ही ढिम्म अर्थांची मुजोरी!

केवढा गलका तिथेही चाललेला...
चांदण्या आहेत की आहेत पोरी!

दुःख सामोरे मला एकेक आले...
तू मला झालीस जेव्हा पाठमोरी!

मी तुझ्या केलेच आहे ना हवाली?
का मनाची तू तरी केलीस चोरी?

मी तुझ्या खेळास कंटाळून गेलो...

जन्म हा माझा, तुझी कितवी लगोरी?

कुंपणाबाहेर आली एक फांदी...
हा तिचा मोठा गुन्हा; ही बंडखोरी!


वरील सर्व शेर अत्यंत आवडले. त्यातही शेवटचे दोन फारच!

अत्यंत सुंदर गझल प्रदीपराव!

(प्रतिसादाचा रंग निळा आल्याबद्दल क्षमस्व! तो कसा घालवायचा ते माहीत नाही. )


-'बेफिकीर'!