रफी साहिबांचे काही उच्चार तर खासच. 'तू गंगा की मौज' मधला 'ज' चा उच्चार,
'तुझे मैं चाँद समझूंगा' मधल्या 'तुझे'तल्या 'झ' चा उच्चार, 'नैन लड गई हो'
मध्ये 'ल ' आणि 'ड' चे कोमल उच्चार,'यह लखनऊ की सर् ज़मीं,'मधला 'ल' चा
खणखणीत उच्चार, गरीब, गलत या शब्दांतले 'ग' चे उच्चार... काय काय म्हणून
लिहायचं? हिंदीतले अनुस्वारयुक्त शब्द तर त्यांच्याइतके सुस्पष्ट आतापर्यंत
कुठल्याच गायक/गायिकेने उच्चारलेले नाहीत, अगदी लताताईंनी सुद्धा. जिन्हें
नाज़ है हिंदपर वह कहाँ हैं, ये आँखें ऊफ यूं मां, 'मैंने जीना सीख लिया',
'यूं तो हमने लाख हसीन देखे हैं,''लाखों हैं निगाह में जिंदगी की
राहमें' हे सर्व आठवून पहा.
या हाताचे त्या हाताला कळणार नाही अशा पद्धतीने* केलेली सढळहस्त प्रशंसा आवडली.
(* किंवा, दुसऱ्या शब्दांत, डेक्स्टेरियसली केलेली सिनिस्टर काँप्लिमेंट**)
**(गरज असल्यास) अधिक माहितीसाठी:
दुवा १ दुवा २ दुवा ३