पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
ग्रंथालय’ म्हणजे पुस्तकांचे माहेरघर. ग्रंथालयात आलेल्या पुस्तकांची योग्य प्रकारे काळजी आणि निगा राखली जावी, त्यांचे योग्य प्रकारे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा साहित्यप्रेमींची असते. मात्र ग्रंथालयाकडूनच पुस्तकांची योग्य काळजी घेतली जात नसेल तर तेथील पुस्तकांना वाळवी लागून ती कुजायला आणि नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मुंबईतील राज्य मध्यवर्ती ग्रंथसंग्रहालयाकडे आलेल्या लाखो पुस्तकांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने त्यांची अक्षरश: दूरवस्था झाली आहे. या पुस्तकांची अवस्था पाहिल्यानंतर साहित्यप्रेमी वाचकांच्या मनाला नक्कीच यातना होतील. ...