बायको समजून  धरलेले जिला मी...
नेमकी सासू निघावी  पाठमोरी!
- हा हा हा.

आमची दुसरी कुठे नाहीच 'फांदी'...
ही पुणेरी धन्यता, ना ही मुजोरी!
- तुझ्याच शब्दांत सांगायचे तर 'पडलो'! "..., ना ही... " ऐवजी '...; नाही...' चालले असते. 
एकूण विडंबन आवडले.

अवांतर १ :
काव्य आहे आमचे  थोडे मुजोरी!
मला वाटते, 'मुजोरी' हे स्त्रीलिंगी नाम आहे, ज्याचे विशेषण 'मुजोर' होते. तेव्हा ही ओळ 'काव्य आहे आमचे/ची थोडी मुजोरी' ('आमचे काव्य ही आमची थोडीशी मुजोरी आहे' ह्या अर्थाने) अशी केली तर निर्दोषही होईल व अर्थही तोच राहील.

अवांतर २ :
प्रदीपरावांच्या गझलेच्या खांद्यावरून तू मारलेली दुसरी गोळीही इथे का नाही दिलीस ? एका गंंभीर विषयावर कवी-विडंबक आपल्या प्रतिभेचा वापर करून कसे भाष्य करू शकतो, कशी सणसणीत चपराक देऊ शकतो हे ह्या चावडीवरील लोकांनाही कळू देत की.