विरोपांमुळे संभाषणकला नष्ट पावत आहे का?  व्यक्तिगत ओलावा नष्ट होत आहे का?

-असे मला मुळीच वाटत नाही. विरोप नव्हते तेंव्हही आपण "वक्ता दशसहस्त्रेशु" असे म्हणत होतो. या "शाब्दिक" प्रमाणात विरोपामुळे काही फरक पडला आहे असे वाटत नाही.  विरोप नव्हते तेंव्हासुद्धा आजीकडून "आजकाल माणूसकी उरली नाही" या प्रकारची वाक्ये ऐकवयास मिळत होतीच.  

तसेच विरोप ज्या काळात उपलब्ध झाले त्याच काळातील इतर अनेक गोष्टींमुळे संभाषणकला जास्त महत्त्वाची झाली आहे वाटते.  

विरोप हे विचार/भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे इतर माध्यमांप्रमाणेच विरोपाची काही बलस्थाने आहेत (बलस्थानेच्या विरुद्ध शब्द काय आहे? ) तसेच काही कमतरता पण आहेत.  

विरोपातून व्यक्तिगत ओलावा जाणवून देणे हिसुद्धा पत्रलेखनासारखीच एक कला आहे असे वाटते.

अर्थात विरोपांच्या आधी आणि नंतर किती व्यक्तिगत ओलावा होता/आहे हा संशोधनाचा विषय ठरावा. काही सुज्ज्ञ मनोगती असे संशोधन शोधून इथे मांडतील तर चर्चेस उपयोगी पडेल.