अतिशय चांगला, वेगळा लेख.  अनुभवसमृद्ध. तुमच्या लेखामुळे शीर्षकातले गाणे यूट्यूबवर जाऊन ऐकले. हे गाणे लहानपणी  धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या म्हणजेच विजयादशमीच्या आसपास रोजच ऐकायला मिळत असे.  ह्या गाण्यामुळे 'जयभीम'ची गर्जना देत दीक्षाभूमीकडे  जाणारी आंबेडकरी जनता आठवली.  बरीचशी जनता अनवाणी असायची. मात्र दरसाल येणाऱ्या ह्या भाविकांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत होणारा सकारात्मक बदल हा त्यांच्या पेहरावातून, देहबोलीतील वाढत्या आत्मविश्वासातून दिसायचा.

तुमचे लिखाण मी आवर्जून वाचत असतो.  ह्या लेखाला आधीच प्रतिसाद द्यायला हवा होता. उशीर झाला. असो.