बडबडी स्नेहल येथे हे वाचायला मिळाले:
नेहमीप्रमाणे अगदी शेवट्पर्यंत ई-मेल्स करत करत ऑफिसचा दिवस संपला आणि मी गाडी काढून असंख्य माणसांपैकी एक होऊन सवयीप्रमाणे रस्त्यातून वाट(??) काढू लागले. घड्याळ बघितलं... ७:४०! आज जरा उशीर च झाला.... रोज ठरवते ७ ला निघायचं पण आज देखील जमलं नाही. निघता निघता काही तरी आठवतं आणि मग ते काम उरकता उरकता वेळ होतोच.