माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर! येथे हे वाचायला मिळाले:
’मुलायमसिंग नि लालूप्रसाद हे सोनिया गांधी यांचे तळवे चाटणारे कुत्रे आहेत’ असे उदगार नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काढले, ते ऐकून हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे. दुस-याला कुत्रा म्हणणे हा शुद्ध गाढवपणा आहे अशी कोटी इथे करता येईल, पण तसे करण्याचा मोह टाळून हेच म्हणतो की गडकरींसारख्या मोठ्या पदावरच्या माणसाकडून माझी ही अपेक्षा नव्हती. गडकरी हे भाजपसारख्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, तेव्हा असे उदगार काढणे योग्य नव्हे हे ज्ञान त्यांना असणार हे नक्की, पण समोर मोठा जनसमुदाय पाहिला की मोठमोठ्या धुरिणांचा पाय ...