"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
आज सहजच विचार आला. सिनेमाचा इफेक्ट जबरदस्त असतो. पण सिनेमातली गाणी? हा प्रकार फक्त आपल्या भारतीय सिनेमांमध्ये पहायला मिळतो. ते आपलं महत्वाचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. गाणी कधीकधी नुसतीच श्राव्य असतात, तर कधीकधी त्यांचं पिक्चरायझेशनही जोरदार असतं. कधीकधी ती सिनेमात अगदी दुधातल्या साखरेप्रमाणे विरघळून जातात, तर कधी ती जेवणात खडा दाताखाली यावा तशी त्रास देतात. तर कधी फक्त गाण्यांचं पिक्चरायझेशनच पूर्ण सिनेमात विरंगुळा देतं. नुसती श्राव्य गाणी किंवा गाण्यांचा दर्जा वगैरे माझा प्रांत नाही. माझ्या..माझ्याच काय प्रत्येकाच्याच संगीतात वेगवेगळ्या ...