नववन१) "पुरेपूर कोल्हापूर" : अप्रतिम कोल्हापुरी जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल, तर आवर्जून भेट द्या. इथले कोल्हापुरी मटणं, तांबडा पांढरा रस्सा लै जबरदस्त असतो(तेही UNLIMITED. तुम्ही पिऊन कंटाळाल, पण त्यांना वाडायचा कंटाळा येत नाही.) बरेच दिवसांपासून ऐकून होतो ह्या हॉटेलबद्दल, पण जायचा योग काल आला.
हॉटेल छोटेसेच पण मस्त आहे. सर्व पदार्थांचा दर्जाही उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे इथले दर देखिल खिशाला परवडणारे आहेत.
२) कोकण किंग हॉटेल - शिळफाटा, डोंबिवली: आगरी पद्धतीचे जेवण आवडत असल्यास एकदम चांगले ठिकाण. मासे नेहमीच ताजे मिळतात. मागेच त्यांचे वाटर पार्क आहे. दिवसभराचा कार्यक्रम ठेवायचा असेल तरीही एक उत्तम option आहे. Entry Fee पण तशी कमीच आहे.
३) गरम मसाला - ऐरोली : इथे मालवणी पद्धतीचे जेवण अतिशय उत्तम मिळते. खेकडा मसाला तर जरुर खाऊन बघा. Sea Food पण नेहमीच फ्रेश असते. नान-व्हेज प्लाटर आणि चिकन क्रिस्पी तर खासच,
४) Cafe Naaz / कोहिनूर - कुर्ला : हि दोन्ही हॉटेल्स मुस्लिम लोकांची आहेत, त्यामुळे ज्यांना काही शंका आहेत त्यांनी ह्या वाटेला न वळलेलेच बरे. अस्सल खवय्ये असाल तर जरुर भेट द्या. चिकनच्या भरपूर वरायटीस इथे आहेत. तंदुरी चिकन, chicken crispy, नाज स्पेशल चिकन, चिकन बिर्याणी, चिकन दमदम बिर्याणी, इ. पदार्थ खासच.
कोहिनूर: अंडा मसाला आणि भरपूर तूप लावलेल्या नरम चपात्या, खासच.
नाजः जेवण झाल्यावर Sweet Dish तर हवीच. मातीच्या खापरीतली थंडगार फिरनि आणि कस्टर्डसाठी गेल्या-गेल्या आर्डर ध्यावी लागते, नाहीतर आपलं जेवून होईपर्यंत संपलेलं असतं.
आज इथेच थांबते, पण यादी खूप मोठी आहे. त्यांची लिस्ट परत कधीतरी.....धन्यवाद.