एका गाववाल्याचा ब्लॉग येथे हे वाचायला मिळाले:
मागच्याच आठवड्याची गोष्ट. संध्याकाळच्या वेळेस घराजवळ अचानकच दभिंची भेट झाली. ओघाओघाने गप्पा मारणेही आलेच. बऱ्याच विषयांवर अनौपचारिक गप्पा झाल्या. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने गेल्या दीड महिन्यात त्यांनी बऱ्याच गावांना, संस्थांना भेटी दिल्या. त्याविषयी बोलणे झाले. बोलण्याच्या ओघात त्यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या आत्मचरित्राचा, "अपार्थिवाचा यात्री'चा उल्लेख आला. दभिंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचे आत्मचरित्र म्हणजे माझ्यासारख्या सामान्य वाचकासाठी एक जिज्ञासेचाच विषय. त्यात हे आत्मचरित्र विरळा. यात आयुष्यातील घटना आणि प्रसंग ...
पुढे वाचा. : एका साहित्यऋषीशी मुक्त संवाद