आपण केलेला अनुवाद भावला. मन:पूर्वक धन्यावाद.

रहस्यकथा हा माझा आवडीचा विषय. सध्या यु. के. मध्ये मुक्काम असल्याने माझी या बाबतीत चंगळ चालू आहे. होम्स, हर्क्युल प्वाइरॉट, मिस मार्पल, लुईस, इन्स्पेक्टर मॉर्स, वेक्सफोर्ड या सिरीयल्स बघायला मिळतात. काही भाग जुनाट वाटला तरी त्यांचे आजही पुन्हा प्रसारण होत आहे आणि त्या तितक्याच खिळवून ठेवतात हे नवलच!

शेरलॉक होम्स वरील अलीकडे निघालेला चित्रपटही चांगला आहे. कथा, अभिनय सगळ्याच बाबतीत. शिवाय होम्सकालीन वातावरणनिर्मीती पण सुरेख साधली आहे. युट्यूब वर याचा ट्रेलर आहेच.