प्रत्यूष......"किमयागार" येथे हे वाचायला मिळाले:
काही दिवसांपूर्वी केरळला असताना नवीन मल्याळम मुव्ही “ आगथन ” पाहण्याचा योग आला . आगथन चा जवळपास पोहोचणारा मराठी अर्थ आपण "आगंतुक" असा घेऊ शकतो. त्याची कहाणी कुठल्याही भारतीय चित्रपटात शोभून दिसेल अशी आहे. हिरो लहान असताना त्याच्या आई - वडिलांना काश्मीरी अतिरेकी मारतात आणि बहिणीवर भारतीय सैन्यातील एक अधिकारी बलात्कार करतो . नंतर हिरो मोठा झाल्यावर मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झालेल्या त्या भारतीय सैन्यातील अधिकारयाचे पितळ कसे उघडे पडतो याची ही कहाणी आहे .